काँग्रेसची सचिन पायलट यांना नोटीस; दोन दिवसांत उत्तर द्या! अन्यथा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । बंडखोर सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. याशिवाय सचिन पायलट यांच्यासह बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या अन्य १८ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिसीचे दोन दिवसात उत्तर देण्यास या सर्वांना सांगितले आहे. अन्यथा विधिमंडळ पक्षाचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली आहे.

अविनाश पांडे यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे की, “सचिन पायलट आणि इतर १८ सदस्यांना विधिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे. जर त्यांनी दोन दिवसांत उत्तर दिलं नाही तर विधिमंडळ पक्षातून आपलं सदस्यत्व रद्द करत आहेत असं समजलं जाईल”.

ते पुढे म्हणाले कि, “देव सचिन पायलट यांना शहापपणा देवो, आणि त्यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करु नये. त्यांना आपली चूक मान्य करावी. सचिन पायलट यांना चर्चा करण्यासाठी दरवाजे नेहमी खुले होते, आजही आहेत. पण आता गोष्टी फार पुढे गेल्या आहेत. आता त्यांचा काही फायदा होणार नाही.” दरम्यान, सचिन पायलट या नोटीसला किती गांभीर्याने घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment