फक्त बोलून दाखवण्यापेक्षा चीनला उत्तर दिल्यास अधिक आनंद होईल- काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला सबोधित केलं. यावेळी “LoC पासून LAC पर्यंत, ज्यांनी कोणी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले, त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळाले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशामध्ये जोश भरलेला आहे” असं मोदी म्हणाले होते. दहशतवाद असो किंवा विस्तारवाद भारत ठामपणे त्याचा मुकाबला करत आहे असे मोदी म्हणाले. त्यांनी नाव न घेता चीन-पाकिस्तान दोघांना टोला लगावला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसनं त्यांच्यावर निशाणा साधला. “केवळ बोलणंच पुरेसं नाही,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी एएनआयशी बोलताना दिली.

ते म्हणाले, “केवळ बोलणंच पुरेसं नाही. जर त्यांनी उत्तर दिलं तर आम्हाला आनंदच होईल. परंतु पण पंतप्रधान आणि त्यांचे सरकार यांना वास्तवाची माहिती आहे. वास्तव चांगलं नाही. जर त्यांनी (चिनी सैनिक) आपल्या क्षेत्रात प्रवेश केला तर संरक्षण मंत्री काही वेगळं बोलतात आणि पंतप्रधान काही वेगळं बोलतात,” असं अहमद पतेल म्हणाले.

याशिवाय, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणानंतर त्यांच्यावर निशाणा साधला. “सर्व भारतीयांनी या स्वातंत्र्यदिनी देशाच्या रक्षणासाठी आणि भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनी सैन्याला परतवण्यासाठी सरकार काय करत आहे असा सवाल केला पाहिजे. लाल किल्ल्यावरील भाषणातून पंतप्रधान LOC ते LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांना भारतीय सैनिकांनी योग्य उत्तर दिले असे म्हणाले. मात्र त्यांनी चीनचे नाव घेतले नाही,” टीका सुरजेवाला यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment