नेहमी राज्यपालांच्या अंगणात जाण्यापेक्षा कधीतरी स्वत:च्या अंगणात जावं; थोरातांचा भाजपला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनानंतर सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घनघोर वाकयुद्ध सुरु आहे. भाजपने आपल्या आंदोलनात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ या कॅचलाईनचा वापर केला होता. हाच धागा पकडत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्यांना ट्विटरवर चिमटा काढला आहे.

”भाजप नेत्यांनी कायम राज्यपालांच्या अंगणात जाण्यापेक्षा कधीतरी स्वत:च्या अंगणात म्हणजेच स्वतःच्या मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, असे थोरात यांनी म्हटले. चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे,” असा टोलाही थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजप नेत्यांना लगावला.

कोरोनाच्या संकटकाळात राजकारण करायचे नाही. केंद्र व राज्य सरकारने एकमेकांच्या सहकार्याने काम करायचे, या पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी साथ दिली. पण मोदी यांच्या पक्षाचेच नेते राज्यात त्यांच्या आवाहनाला बगल देत आहेत. सत्ता गेल्यामुळे राज्यातील भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड चालली आहे, असंही थोरात यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment