भाजपकडून देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम; बाळासाहेब थोरातांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे आंदोलन केले जात आहे. यावर भाजपकडून टीका केली जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे. “आजचा महाराष्ट्र बंद लोकशाही वाचविण्यासाठी आहे. देशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम भाजप सरकारने केलं आहे, असे थोरात यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील सर्वच नेत्यांकडून रस्त्यावर उतरून भाजप व मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी आंदोलनात काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातल्या लखीमपुरातल्या घटनेने देशातील शेतकरी वर्ग भयभीत आहे. आजचा महाराष्ट्र बंद लोकशाही वाचविण्यासाठी आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आजचा बंद हा मोदी सरकारच्या विरोधात आहे. लखीमपूर खेरी येथील घटनेतील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न चालला आहे हे खूप दुर्देवी गोष्ट आहे, असेही थोरात यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment