लक्षात ठेवा पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते; अशोक चव्हाणांचा भाजपवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असे चित्र पहायला मिळत आहे. त्याची प्रचिती पंढरपूर पॉट निवडणुकीत सर्वांना आली. आता त्यानंतर देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक लागल्याने भाजपने ‘पहेले पंढरपूर अब देगलूर’ असा नारा दिला आहे. त्यावर काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. “पंढरपूरसारखी लॉटरी एकदाच लागते, असे विधान चव्हाण यांनी केले आहे.

कोंडलपूर येथे काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचाराचा काल थाटात शुभारंभ पार पडला. यावेळी चव्हाण म्हणाले की, देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अंतापूरकर यांचा अर्ज उद्या दि. ७ रोजी दाखल करण्यात येणार आहे.

काँग्रेस पक्षाकडे चार-पाच इच्छुकांनी उमेदवारी मागितली होती; पण जिल्हा काँग्रेसच्या शिफारशीनुसार जितेश अंतापूरकर यांचे नाव सोमवारी रात्री जाहीर केले. त्यानंतर इच्छुकांतील भीमराव क्षीरसागर आणि मंगेश कदम यांनी अंतापूरकर यांच्या उमेदवारीला सहमती दर्शवली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी मित्रपक्षांनी आपला पाठिंबा काँग्रेस उमेदवाराला दिला आहे.

Leave a Comment