दंगलीत आरोपी असलेल्यांनी शहाणपणा करु नये; अशोक चव्हाणांचा अनिल बोंडेना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये नुकतीच हिंसाचाराची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नांदेडमध्येही माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही बोंडेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले. “दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडे यांनी या ठिकाणी येईन शहाणपणा करु नये, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल बोन्डे यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अनिल बोन्डे यांच्याकडून माझ्यावर जे आरोप केलेले आहेत. ते सर्व हास्यास्पद आहे. खरे म्हणजे बोन्डे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

नांदेडमध्ये झालेल्या दंगलीवरून भाजप नेते अनिल बोंडे यांनी थेट काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नांदेडमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती आणि दंगलखोरांना राजाश्रय दिला जात आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असी मागणीही बोंडे यांनी केली आहे. त्यांच्या मागणीनंतर चव्हाण यांनी बोन्डेना प्रत्युत्तर दिले आहे.

You might also like