काँग्रेसला सल्ला देण्याएवढी नवाब मलिकांची पात्रताच नाही; बाळासाहेब थोरातांनी फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना युपीए वगेरे काही नाही अस विधान केले होते. यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळत “काँग्रेसने आता वास्तव स्वीकारावे” असा टोमणा मारला. दरम्यान मलिकांच्या या विधानाचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, नबाव मलिकांनी काँग्रेसला सल्ला द्यावं हे काही योग्य नाही. काँग्रेसला सल्ला द्यावा अशी एवढी नवाब मलिक यांची पात्रताच नाही असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी नवाब मलिक यांच्या विधानाला फटकारले आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर देखील टीका केली. ममता बॅनर्जी आज युपीएच्या सदस्यही नाहीत. आतापर्यंत भाजपाला जो विरोध केला आहे तो काँग्रेसने, युपीएने, राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. शेवटी नेतृत्व काँग्रेसलाच करावं लागणार आहे,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

Leave a Comment