हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अजब वक्तव्य करत मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीवरून शिवसेने पाठोपाठ आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही सवदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांवर निशाणा साधला आहे.
भाई जगताप म्हणाले, भाजपाचे कर्नाटकातील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दात निंदा करतो. सवदी यांना समजलं पाहिजे की ज्या महाजन समितीचा हवाला ते देत आहेत, तो अहवाल काय आहे? सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला मुंबईचा नाही. तो बेळगाव आणि जवळपासच्या मराठी भाषिक भागाचा आहे. मुंबईविषयी ते इतकं बेजबाबदार बोलू शकतात.
मला तर आश्चर्य वाटतंय की, भाजपाचे चमचे, भाजपाचे नेते, देवेंद्रे फडणवीस जे खूप मोठं मोठ्या गोष्टी बोलत असतात. त्यांना हे दिसत नाही का? मुंबईविषयी कर्नाटकाचा भाजपाचा उपमुख्यमंत्री बोलत आहेत आणि आपण मुंबईविषयी एक शब्द काढला नाही. गप्प बसला आहात. कंगना रणौतसारख्या दोन टक्क्यांच्या कलाकारांने मुंबईला पाकिस्तान म्हटलं होतं, तेव्हा हे देवेंद्र फडणवीस यांचे चमचे तिला झाशीची राणी म्हणत होते. आज भाजपा उपमुख्यमंत्री मुंबईविषयी बोलत आहेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहात. महाराष्ट्र व मुंबईविषयी तुमचं हेच प्रेम आहे का?,” अशी टीका भाई जगताप यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’