कोरोनावर लस विकसित झाल्यास पुढं काय?, राहुल गांधी म्हणाले..

नवी दिल्ली । संपूर्ण जगात कोरोनावरील लस विकसित करण्यावर अहोरात्र काम सुरू आहे. दरम्यान, भारतात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा वेळी कोरोनावरील लस विकसित झाल्यास ती लस प्रत्येक भारतीय नागरिकाला देण्यासाठी मोठ्या तयारी करावी लागणार आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूवरील लसीसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. कोरोना विषाणूची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक रणनिती आखण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

“भारत करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये सहभागी होईल. देशाला एक स्पष्ट आणि सर्वांना सामावून घेणारी रणनिती आखायला हवी. जेणेकरून ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि सर्वांना ही लस सहजरित्या घेता येईल. केंद्र सरकारनं हे आताच करायला हवं,” असं राहुल गांधी म्हणाले.

त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. यापूर्वी गुरूवारी त्यांनी कोरोनावरील एक आलेख शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. “जर ही पंतप्रधानांची नियंत्रणातील स्थिती आहे तर नियंत्रणाबाहेरील स्थिती कशी असेल?,” असा सवाल त्यांनी मोदी सरकारला केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like