ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, काँग्रेस नेत्यांवर केलेली टीका सहन करणार नाही ; नाना पटोलेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. परंतु राऊतांच्या या मागणीमुळे महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडल्याचे चित्र दिसत असून काँग्रेस राऊतांविरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

नाना पटोले म्हणाले, काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यूपीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये, असा टोलाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला.

ते पुढे म्हणाले, राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, असा प्रश्न पडला आहे. दिल्लीत यूपीए 2 स्थापन करण्याच्या हालचाली व त्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांकडे यूपीएचे नेतृत्व सोपवावे, ही केलेली मागणी हास्यास्पद आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like