‘राजा इतना भी फकीर मत चुनो की’… सिद्धूंचा मोदींवर पुन्हा त्याचं वाक्याने निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्लीत सुरु सलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका सुरूच आहे. राजा इतकाही संत (फकीर) निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल, अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) अप्रत्यक्ष निशाणा साधला. विशेष म्हणजे 2019 मध्येही आचार्य चाणक्यांच्या याच वाक्याचा हवाला देत सिद्धूंनी मोदींवर थेट वार केला होता. (Navjot Singh Sidhu lashes on PM Narendra Modi over Farmer Protest)

नवजोत सिंह सिद्धू यांनी एप्रिल 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचे अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योजकांसोबतचे फोटो शेअर केले होते. तेव्हाही “राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख ले” हेच कॅप्शन सिद्धूंनी दिले होते. आता उत्तर भारतात पेटलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धूंनी पुन्हा मोदींवर प्रहार केला आहे.

सिद्धूंचे एप्रिल 2019मधील ट्विट

 

खाजगी पीक विमा कंपन्यांनी सरकारी विमा कंपन्यांची जागा घेत शेतकऱ्यांची लूट चालवली आहे, असा आरोप सिद्धूंनी दोन दिवसांपूर्वी केला होता. कृषी क्षेत्र अदानी-अंबानी गँगकडे सुपूर्द करण्यासाठी नव्या कृषी कायद्यांची रचना केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत अदानी-अंबानींची मोनोपॉली स्थापित करण्याचा हा डाव आहे, असा आरोप सिद्धू यांनी ट्विटरवरुन केला होता.

31 हजार कोटींची पीक विमा योजना होती, मात्र त्यापैकी 15 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले, तर 16 हजार कोटी बिर्ला, टाटा, अंबानी यांच्या खिशात गेले. आधी केंद्र आणि राज्य सरकार नाममात्र शुल्क आकारुन एलआयसी आणि अन्य कंपन्यांना पीक विमा देत असत, मात्र नंतर खासगी कंपन्या हा क्षेत्रात उतरल्या, असा दावाही सिद्धू यांनी व्हिडीओ शेअर करत केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment