महत्त्वाकांक्षी असण्यात काहीही गैर नाही! प्रिया दत्त यांनी केली सचिन पायलटांची पाठराखण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून मंगळवारी दुपारी हकालपट्टी केली आहे. अशा वेळी इतर राज्यांमधील तरुण काँग्रेसजनांमध्ये सचिन पायलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत सचिन पायलट यांची पाठराखण केली आहे. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही प्रचंड गुणवत्ता असलेले तरुण उमदे नेते असून महत्त्वाकांक्षी असण्यात काहीही गैर नाही असं प्रिया दत्त यांनी ट्विटवर म्हटलं आहे.

प्रिया दत्त यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं कि, ”माझ्या आणखी एका मित्राने पक्ष सोडला. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही प्रचंड गुणवत्ता असलेले तरुण उमदे नेते होते. आमच्या पक्षाने हे दोन्ही नेते गमावले आहेत. महत्त्वाकांक्षी असण्यात काहीही गैर नाही, असे मला वाटते. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य सिंधिया या दोघांनीही कठीण काळात पक्षासाठी मेहनत घेतली आहे.” प्रिया दत्त यांच्या या एकूण ट्विटचा सूर हा ज्येष्ठांविषयी नाराजी व्यक्त करणार आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये तरुण विरुद्ध ज्येष्ठ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रिया दत्त यांनी २०१९ साली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसांघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीपासून मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी माजली आहे. पक्ष संघटनेत परस्परविरोधी गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रिया दत्त लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणापासून दूरच राहिल्या आहेत. मात्र, काँग्रेसमधील तरुण नैतृत्वांपैकी त्या एक महत्वाच्या नेत्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment