चीननं घुसखोरी केली नाहीचं, असं म्हणणारे लोक देशभक्त असूच नाहीत- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमावाद अजूनही संपुष्टात आलेला नाही आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, तरीही सीमावादाचा तिढा सुटताना दिसत नाही आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी व्हिडीओ ट्विट करून चीनच्या भारतीय सीमेतील घुसखोरीच्या मुद्यावर आपली भूमिका मांडत आहेत. राहुल गांधी यांनी नवीन व्हिडीओ शेअर केला असून, त्यात त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ”चीननं घुसखोरी केलेली नाही, असे म्हणणारे लोक देशभक्त असूच नाहीत” अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आहे.

ट्विटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत राहुल गांधी म्हणाले कि, “चीननं माझ्या देशात घुसखोरी केलेली नाही, असं मी खोटं बोलणार नाही. माझं पूर्ण करिअर बुडालं तरी चालेल, पण मी स्पष्ट करू इच्छितो की मी खोटं बोलणार नाही. मला वाटत चीननं घुसखोरी केली नाही, असं काही लोक खोटं बोलत आहेत. मला वाटत हेच लोक राष्ट्रवादी नाहीत. माझ्या मते जे लोक खोटं बोलत आहेत आणि सांगत आहेत की चीननं घुसखोरी केलेली नाही, ते लोकच देशभक्त नाहीत. मला याची राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल, माझं राजकीय करिअर संपल, तरी काळजी नाही. पण, जिथपर्यंत भारतीय भूभागाचा प्रश्न आहे, मी केवळ सत्य बोलेल,” असं राहुल गांधी म्हणाले.

“एक भारतीय म्हणून माझी पहिली प्राथमिक देश आणि देशातील जनता आहे. हे एकदम स्पष्ट आहे की, चीन आपल्या भूभागात घुसलेला आहे. ही गोष्ट मला अस्वस्थ करते. खरं सांगायचं तर माझं रक्त उसळतं. दुसरा देश माझ्या देशाच्या भूभागात येऊ कसा शकतो? आता एक राजकीय नेते म्हणून तुम्हाला वाटत की, मी गप्प रहावं आणि माझ्या लोकांशी खोटं बोलावं. जेव्हा की सत्य मला कळालं आहे. मी सॅटेलाईट फोटो बघितले आहेत. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि तुम्हाला वाटत की मी खोटं बोलावं,” असं राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उद्देशून म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment