Saturday, March 25, 2023

आशा सेविकांच्या आंदोलनावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर घणाघाती टीका, म्हणाले..

- Advertisement -

नवी दिल्ली । देशावर आलेल्या कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी आशा सेविका ग्रामीण आणि शहरी भागात महत्वाचं योगदान देत आहेत. मात्र, एवढं करूनही आशा सेविकांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावं लागत आहे. देशातील ६ लाख आशा सेविकांनी संप पुकारला आहे. याच मुद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. “मोदी सरकार आधी मुकं तर होतंच, पण आता आंधळ आणि बहिरंही झालंय, अशी घणाघाती असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

राहुल गांधी यांनी आशा सेविकांच्या संपावरून ट्विटरवर मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटलं कि, “देशातील प्रत्येक घरापर्यंत आशा सेविका आरोग्य सुरक्षा पोहोचवतात. खऱ्या अर्थानं त्या आरोग्य योद्धा आहेत, पण आज स्वतःच्या हक्कासाठी संप करण्यासाठी मजबूर झाल्या आहेत. सरकार मुकं तर होतंच, पण आता आंधळं आणि बहिरंही झालंय,” अशा शेलक्या शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.

- Advertisement -

दरम्यान, सन्मानजनक आणि वेळेवर वेतन मिळावं, त्याचबरोबर वेतन निश्चित करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी आशा सेविकांनी संप पुकारला आहे. याशिवाय विमा व आपत्ती भत्ता आदी सुविधा देण्याची मागणीही आशा सेविकांशी संबंधित असलेल्या संघटनांनी सरकारकडे केली आहे. देशभरातील ६ लाख आशा सेविका या संपामध्ये सहभागी झाल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”