मोदी सरकार म्हणजे, ‘किमान शासन, जास्तीजास्त खासगीकरण’: राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘किमान शासन, जास्तीजास्त खासगीकरण’ ही मोदी सरकारची विचारसरणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकार देशात अनेक क्षेत्रात खासगीकरणाला चालना देत असताना राहुल यांनी त्यांवर बोटं ठेवलं आहे.

“मोदी सरकारची विचारसरणी – ‘किमान शासन, जास्तीजास्त खासगीकरण’, कोविड तर एक निमित्त आहे, शासकीय कार्यालये ‘स्थायी कर्मचारी मुक्त’ बनवायचे आहेत. तरुणांचे भविष्य हिरावून घ्यायचे आहे, ‘मित्रांना’ पुढे न्यायचे आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटसोबत एक बातमी देखील शेअर केलेली आहे. ज्यामध्ये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकराने खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने नव्या पदभरतींवर स्थगिती आणली असून, रिक्त पदांची भरती केली जात नसल्याचे म्हटले आहे. सोबतच #SpeakUp हा हॅशटॅग देखील जोडलेला आहे. या अगोदर राहुल गांधी यांनी, “१२ कोटी रोजगार गायब, ५ ट्रिलिअन अर्थव्यवस्था गायब, सामान्य नागरिकांचं उत्पन्न गायब, देशातील आनंदी वातावरण आणि सुरक्षा गायब, प्रश्न विचारला तर उत्तर गायब, विकास गायब आहे,” असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

You might also like