काँग्रेस नेते राहुल गांधी लखीमपूरला रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूरला घडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावरून काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर ते खेरी येथे झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रवाना झाले.

काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी हे जेव्हा लखनौ विमानतळावर पोहचले तेव्हा त्यांना पोलिसांकडून रोखण्यात आले. मात्र नंतर काही अटींवर त्यांना जाण्यास परवानगी देण्यात आली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लखनौ विमानतळावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुल गांधी यांनी लखनौला जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. तसेच भाजपवर हल्लाबोलही केला. अखेर पत्रकार परिषद झाल्यानंतर राहुल गांधी लखीमपूरला रवाना झाले.

Leave a Comment