भारत तरुणांना नोकरी देऊ शकणार नाही; पटत नसेल तर पुढील 6 ते 7 महिने वाट पाहा!- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनी व्हर्च्यूअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर टीका केली. “भारत तरुणांना नोकरी देण्यात असमर्थ ठरणार आहे. हे स्पष्ट आहे. देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही असं याआधी गेल्या ७० वर्षात कधीही झालेलं नाही,” अशी टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. पुढील 6 ते 7 महिन्यात देशासमोर रोजगाराचे संकट उभं राहणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. कोरोनासंबंधी इशारा दिल्यानंतर मीडियाने आपली खिल्ली उडवली होती अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

“कोरोनामुळे मोठं नुकसान होईल असं मी सांगितलं असता मीडियाने माझी खिल्ली उडवली. जर तुम्हाला विश्वास नसेल तर माझं ऐकू नका. मी आज सांगतोय की, भारत तरुणांना नोकरी देऊ शकणार नाही. जर तुम्हाला पटत नसेल तर पुढील 6 ते 7 महिने वाट पाहा,” असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

यामागील कारण सांगताना राहुल गांधींनी म्हटलं आहे की, ”भारतात ९० टक्के रोजगार असंघटित क्षेत्रात आहे. छोट्या कंपन्या, शेतकरी सर्व व्यवस्थाचं मोदींनी संपवली आहे. एकामागोमाग एक कंपन्यात बंद होत आहेत. लघु आणि मध्यम उद्योगही कर्जाच्या हफ्ते फेडण्यात मिळालेली सूट संपल्यानंतर नष्ट होतील,” असा इशारा राहुल गांधींनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.