देशात आर्थिक त्सुनामी येणार असं सत्य मी बोललो तेव्हा भाजप आणि माध्यमांनी माझी थट्टा केली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून, सेवा क्षेत्रासह अनेक उद्योग संकटात आले आहेत. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकार आणि माध्यमांवर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये देशात आर्थिक त्सुनामी येणार हे काही महिन्यांपूर्वीच मी म्हणालो होतो. पण, देशाला सत्य परिस्थिती विषयी इशारा दिला म्हणून भाजपा व माध्यमांनी माझी थट्टा केली होती अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आणि माध्यमांवर केली.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं कि, “लघु व मध्यम उद्योग नष्ट झाले आहेत. मोठंमोठ्या कंपन्या प्रचंड तणावाखाली आहेत. बँकाही संकटात आहेत. मी काही महिन्यांपूर्वी आर्थिक त्सुनामी येणार असं म्हणालो होतो. देशाला सत्य परिस्थितीविषयी इशारा दिला होता. पण, त्यावरून भाजपा आणि माध्यमांनी माझी थट्टा केली होती,” असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयन्त केला.

कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट आणि त्यानंतरच्या धोरणांमुळे ५०० बड्या कर्जदार कंपन्यांवर आणखी १ लाख ६७ हजार कोटी रुपयांचा बोजा वाढू शकतो. त्यामुळे या आणि पुढील वित्त वर्षात हे खासगी कर्जदार परतफेड करण्यात कूचराई करतील, असे पतमानांकन संस्थेचं म्हणणं आहे. यापेक्षाही कठीण परिस्थिती आलीच तर कर्जाच्या अतिरिक्त बोजा आणखी १.६८ लाख कोटींनी वाढू शकतो, अशी शक्यताही संस्थेनं वर्तवली आहे. याच माहितीचा हवाला देत राहुल गांधी यांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर बोट ठेवलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment