खबरदार! नाहीतर.. भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra-karnataka Border issue) कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार आमनेसामने आलं आहे. सीमावादावरुन बेळगाव सोडा मुंबई (Mumbai) देखील कर्नाटकचा भाग आहे, असं विधान करणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्यावर राज्यातील नेत्याकडून भाजप आणि सावदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. काँग्रेसनंही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे. ‘मुंबईकडे वाईट नजरेनं पाहिल्यास भाजपला (BJP) महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होऊन जाईल,’ असा इशारा (Congress) महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.

सचिन सावंत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकांचे दाखले देत भाजपवर हल्ला चढवला. ‘सावदी यांच्या या मागणीतून मोदी सरकारचा कुटिल डाव दिसून येतो. मुंबईला व महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा भाजपचा अंतस्थ हेतू राहिला आहे. गेल्या सहा वर्षांत मुंबईची, महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची ज्या पद्धतीनं बदनामी केली गेली ते सर्वांच्या समोर आहे असं सावंत म्हणाले.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र व इतर उद्योग गुजरातला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, फडणवीस सरकार गप्प बसून होतं. त्यांच्या या भूमिकेमुळं भाजपचं कारस्थान उघडं पडलं आहे. मुंबईला केंद्रशासित करावं हाच यामागचा हेतू होता. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन बॉलिवूड दुसरीकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. सीबीआय, ईडी आणि एनसीबी मागे लावून उद्योगांना नामोहरम केलं जातं. बॉलिवूड कलाकारांना त्रस्त केलं जातं हा याच डावाचा भाग आहे,’ असा आरोप सावंत यांनी केला आहे.

मुंबईविषयी नेमकं काय म्हणाले होते लक्ष्मण सावदी
बेळगाव सोडा मुंबई देखील कर्नाटकचा भाग आहे. मुंबईवर कर्नाटकचाही हक्क आहे. हे शहर कर्नाटकात असले पाहिजे, अशी कानडी जनतेची भावना आहे. त्यामुळं मुंबई कर्नाटकात येत नाही तोवर हे शहर केंद्रशासित म्हणून घोषित करावे, असं वक्तव्य सावदी यांनी केलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

Leave a Comment