चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्पसारखी ; सचिन सावंत यांचा जोरदार टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.  चंद्रकांत पाटील यांची अवस्था डोना़ल्ड ट्रम्प यांच्यासारखी झाली आहे. त्यांना पराभवाची कारणमीमांसा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा समोर करताना नाकी नऊ आले असतील असा जोरदार टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.

कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, ज्या ठिकाणी बॅलेटवर निवडणुका झाल्या आहेत. तिथेही भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.

दरम्यान शुक्रवारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनंगटीवार हे तीन बडे नेते दिल्लीत दाखल झाले होते. या तिन्ही नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. यावेळी  भाजपच्या दिल्लीतील या बैठकीत स्थानिक निवडणुकांमध्ये पराभव आणि आगामी निवडणुकांवर बैठक आयोजित केली होती. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला ताकद देण्यासाठी नवी रणनीती तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment