काँग्रेस अध्यक्षपदी पवारांच्या नावाची चर्चा हे तर राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र – काँग्रेस नेत्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीए अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्यांनी काल जोर धरला होता . परंतु खुद्द शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळली आहे. मी युपीएचा अध्यक्ष होणार या बातमी मध्ये तथ्य नाही असं स्पष्ट करत शरद पवारांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चेपाठीमागे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान सुरु आहे त्याचाच भाग म्हणजे पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चा”, असं खळबळ उडवून देणारं ट्विट निरुपम यांनी केलं आहे. याच अभियानाच्या अंतर्गत 23 सह्यांचं पत्र लिहिलं गेलं होतं, असंही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

वारंवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामधल्या उणीवा दाखवण्याचं काम एक ठराविक वर्ग करतो आहे. काँग्रेस मिटवण्याचा एक मोठा प्लॅन चालू आहे”, असं मोठं विधान आपल्या ट्विटमधून संजय निरुपम यांनी केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व बातम्या निराधार असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment