देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हातात ; राहुल गांधींचं केंद्रावर टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे.

खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, लोकांच्या हातात रोख रक्कम पैसे राहतील ही गोष्ट आता विसरा. मोदी सरकारने आपली मालमत्ता आपल्या उन्मत्त भांडवलशाही मित्रांच्या ताब्यात देण्याची योजना आखली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे काही राज्यांमधील निवडणुकांसाठी तयार केलेला मार्ग आहे. गरिबांच्या हातात रोख मिळेल, अशा काही तरतुदी यात करण्यात येतील, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, खासगीकरण आणि निर्गुंतवणूक करत देश विक्रीसाठी ठेवला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे का, असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment