मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस; काँग्रेस नेत्याची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाऊ लागली आहे. पेगसस, शेतकरी आंदोलन यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत असताना आज काँग्रेसच्या नेत्या तथा महिला,बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोदींवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस आहेत. केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी आहे,” असे ठाकूर यांनी म्हंटले आहे.

सध्या देशातील हेरगिरी प्रकारनावरून मोदी सरकार चांगलेच विरोधकांच्यातवडीत सापडले आहेत. त्यामुळे केंद्रातील विरोधकांप्रमाणे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडूनही मोदी सरकारवर हल्लाबोल केला जाऊ लागला आहे. दरम्यान आज काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी नंदुरबारमध्ये आयोजित एका कार्यक्रम केंद्र आणि मोदींवर जोरदार टीका केली. केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी आहे. भगवा ही कुणा एका पक्षाची जहागीर नाही. मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस आहेत, असे ठाकूर यांनी म्हंटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्यानंतर पंतपधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आल्याची माहिती दिल्यापासून त्यांच्यावर काँग्रेस नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे.

Leave a Comment