अभिनेत्री कंगना रानावत विरोधात तक्रार दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनीही राणावत हिच्या वक्तव्याचे समर्थन केले. कंगनाच्या वक्तव्यामुळे काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. दरम्यान, आज अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हाजी सय्यद कमरोद्दीन यांनी तक्रार दाखल केली आहे.

हाजी सय्यद कमरुद्दीन यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, “अभिनेत्री कंगना राणावत हिने वादग्रस्त वक्तव्य करून स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केला आहे. त्यामुळे कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच याबाबत पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांना निवेदनही दिले आहे”.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिचा नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मात्र त्यानंतर तिने दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामध्ये तिने “देशाला खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळल्याचे म्हटले. यापूर्वी मिळाली ती भीक होती, असे म्हणत कंगनाने देशभरातील स्वातंत्रवीरांचा अपमान केला. त्यामुळे तिच्यावर चोहोबाजुनी टीका केली जात आहे.

You might also like