मी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने राजकीय भान हरवले ; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातील दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या काँग्रेस मधील अंतर्गत वाद उफाळून आले असतानाच आता पुन्हा एकदा दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकावरून काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जबाबदार धरलं आहे. तसंच २००४ मध्ये प्रणव मुखर्जी यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपवली असती तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पाहावा लागला नसता असं काही नेत्यांचं मत होतं, असा दावा प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ‘द प्रेसिडेन्शिअल ईयर्स’मध्ये केला आहे. मुखर्जी यांनी निधनापूर्वी हे पुस्तक लिहिलं असून रूपा प्रकाशन द्वारे ते जानेवारी महिन्यात प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकातील काही भाग सध्या समोर आला आहे. जर मी पंतप्रधान झालो असतो, तर पक्षावर सत्ता गमावण्याची वेळ आली नसती असेही प्रणव मुखर्जी यांनी लिहिले आहे.

‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’चे प्रकाशन रूपा पब्लिकेशन्सद्नारे होत आहे. डॉ. प्रणव मुखर्जी लिहितात, ‘काँग्रेसच्या काही सदस्यांनी असा अनुमान लावला होता की, जर मी सन २००४ मध्ये पंतप्रधान झालो असतो, तर सन २०१४ मध्ये काँग्रेसचा पराभव कदाचित झाला नसता. मात्र मी हा विचार स्वीकारत नाही, मात्र मी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाने राजकीय भान हरवले असे मी मानतो. सोनिया गांधी या पक्षातील प्रकरणे सांभाळण्यात असमर्थ होत्या, तर डॉ. (मनमोहन) सिंह दीर्घकालीन अनुपस्थितीमुळे इतर खासदारांचा व्यक्तिगत संपर्क संपुष्टात आला.’

प्रणव मुखर्जील लिहितात, ‘शासन करण्याचा नैतिक हक्क हा पंतप्रधानांचा असतो असे मी मानतो. राष्ट्राची संपूर्ण स्थिती पंतप्रधान आणि त्यांच्या प्रशासनाच्या कामकाजाला प्रतिबिंबित करते. डॉ. सिंह यांना आघाडीला वाचवण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे शासनावर भारी पडले. मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकालात शासनाच्या एक निरंकुस शैली अंगिकारलेली दिसत आहे. जसे, सरकार, विधिमंडळ आणि न्यायपालिकेच्या कडू संबंधांद्वरे पाहिले जाते. या सरकारच्या दुसऱ्या कार्यकालात अशा बाबतीत उत्तम समज आहे की नाही हे येणारा काळच ठरवेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment