मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र ; सरकारला दिले ‘हे’ महत्त्वाचे सल्ले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना चा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई गतीमान करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी मागणी मनमोहन सिंग यांनी या पत्रातून केली आहे. आम्ही किती लसीकरण केलं हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

राज्यांना फ्रंटलाईन वर्कर्सच्या श्रेणीची परिभाषा ठरवण्यासाठी राज्यांना अधिकार देण्यात यावेत. तसेच 45 वर्षाखालील लोकांनाही लस देण्यास परवानगी देण्यात यावी, असं सांगतानाच भारतातील व्हॅक्सीन निर्मात्यांना सवलती दिल्या पाहिजे. इस्रायलच्या धर्तीवर अनिवार्य लायसेंसिंगची तरतूद केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

पुढच्या सहा महिन्यांसाठी लसींची ऑर्डर देण्यात आली आहे. या लसींचं राज्यांना वितरण कसं होणार? याबाबतची माहिती दिली पाहिजे. जर आपल्याला वेळेत लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर पुरेश्या प्रमाणात ऑर्डर दिली पाहिजे. त्यामुळे लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही त्यावेळेत उत्पादन करणं शक्य होईल, असं सिंग यांनी म्हटलं आहे

मनमोहन सिंग पुढे म्हणाले की, लस उत्पादकांना भारत सरकारने अधिक सवलती द्याव्यात. इस्त्राईलप्रमाणेच अनिवार्य परवाना देण्याच्या तरतुदी लागू केल्या पाहिजेत. युरोपियन मेडिकल एजन्सी किंवा यूएसएफडीएसारख्या विश्वासार्ह एजन्सींनी वापरण्यासाठी मंजूर केलेली कोणतीही लस देशांतर्गत आयातीसाठी वापरावी, अशी सूचना मनमोहन सिंग यांनी केली.

ज्या लसी येणार आहेत त्या लसी राज्यात कशा पोहोचतील याचीही काळजी घेतली पाहिजे. यामध्ये पारदर्शकताही असली पाहिजे. आपत्कालीन वापरासाठी १० टक्के लस ठेवावी. राज्यांना प्रंटलाईन वर्कर्स निश्चित करण्यासाठी सूट द्यावी. तसंच लसीकरणासाठी वयोमर्यादेतही सूट देण्यात यावी, असं मनमोहन सिंग यांनी सूचवलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment