हवं तर बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवा! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात काय करता- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? अशी विचारणा माजी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील अर्थव्यस्थेवर येणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मोदी सरकार गंभीर नसल्याच्या मुद्यावर राहुल गांधी वारंवार त्यांच्यावर टीका करत आहेत. येणाऱ्या काळात देशावर तसेच नागरिकांवर पडणारा आर्थिक बोजा लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्र सरकारच्या कपातीवर राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, “कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यकरण परियोजना यांसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात (DA) कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे”.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारनं जास्तीच्या खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त महागाई भत्त्याचा हफ्ता तूर्तास थांबवला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारीपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यापोटी देय असलेला अतिरिक्त हफ्ता त्याचबरोबर निवृत्ती वेतनधारकांना महागाईपोटी दिला जाणाऱ्या भत्त्याचा अतिरिक्त हफ्ता दिला जाणार नाही. तसेच १ जुलै २०२० पासून ते १ जानेवारी २०२० पर्यंतचे महागाई भत्त्याचे अतिरिक्त हफ्ते दिले जाणार नाही. याच निर्णयावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”

 

Leave a Comment