सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंधन दरवाढविरोधातील काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. देवंद्र फडणवीस नौटंकी बोलून सामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसकडून सायकल रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

नाना पटोलेंनी इंधनाच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी तसेच मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत योग्य माहिती पुरवण्याची, महाराष्ट्राला जास्तीत जास्त लसी मिळाव्या यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन दिल्याचे सांगितले. केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर काँग्रेस हे आंदोलन आणखी तीव्र करेल असा इशारा पटोलेंनी यावेळी दिला.

काँग्रेसने सायकल रॅली काढला ही नौटंकी वाटत असेल तर सामान्य जनतेचं जगणं मुश्कील केलं भाजपच्या सरकारने केलं आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत का?” असा सवाल नाना पटोले यांनी फडणवीस यांना केला.