व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस वऱ्हाडी नव्हे तर बाप आहे; नाना पटोलेंनी सुजय विखेंना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस म्हणजे बिनबुलाये वऱ्हाडी अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस आजही देशात बापच आहे. सुजय विखे अजून लहान आहे अस म्हणत नाना पटोले यांनी त्यांना फटकारले आहे.

नाना पटोले म्हणाले, सुजय विखे पाटील याच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. कारण तो अजून मुलगा आहे. ज्या पक्षाचे खासदार म्हणून सुजय विखे मिरवतात, ती भाजप देशात काॅंग्रेसने केलेल्या विकासावरच आपले ढोल बडवत आहे. देशात आजही काॅंग्रेस पक्ष बापच आहे. स्वातंत्र्य काळानंतर काँग्रेसने केलेल्या विकासकामांमुळेच देश आज प्रगतीपथावर आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल.

सुजय विखे नेमकं काय म्हणाले होते-
महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. त्यात राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. कारण त्यांची मनमानी सुरु असते. शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे, ती बिचारी काहीच बोलत नाही. तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली होती