अन्यथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची नोकरी जाणार; नाना पटोलेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सचिन वाझे प्रकरणावरून जोरदार टीकास्त्र सोडलं होत. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर देत फडणवीसांना टोला लगावला आहे.

नाना पटोले म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिल्लीवाल्यांना आनंदी ठेवण्यासाठी बोलवं लागतं. अन्यथा त्यांची नोकरी जाणार. वाझे प्रकरणात फडणवीस आपलं स्वताचं अनुभव सांगतात असाही पटोलेंनी टोला लगावला. भाजप विरोधातील आघाडीचा आत्मा काँग्रेस आहे, असा दावाही पटोलेंनी केला. फडणवीस यांच्या गुप्त बैठकांबाबत आपल्याला माहिती नाही कारण आपल्याकडे ईडी अथवा सीबीआय नसल्याचा उपरोधिक टोला त्यांनी भाजपाला लावला.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले –

राज्यात फक्त वसुली सरकार आहे. 100-100 कोटी रूपयांच्या वसुली मध्ये पोलिसातला वाझे सापडला असून अजून वेगवेगळ्या विभागातले वाझे आहेत. असे फडणवीस यांनी म्हंटल होत. कुठल्याही सरकारमध्ये 1 मुख्यमंत्री असतो, पण या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री समजतो, एक निर्णय घेतला जातो, तो तासाभरात रद्द होतो, मग दुसऱ्यादिवशी पुन्हा निर्णय घेतला जातो, सरकार आहे की सर्कस आहे? असा खोचक सवालही फडणवीसांनी विचारलाय.

Leave a Comment