आता अधिवेशनात माण- खटावचा प्रश्न नसतो; नाना पटोलेंचा जयकुमार गोरेंना टोला

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

आता अधिवेशनात माण- खटावचा प्रश्न नसतो असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे माण खटावचे आमदार जयकुमार गोरें याना टोला लगावला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, सोनल चौहान, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, अँड. उदयसिंह पाटील, रणजितसिंह देशमुख यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले म्हणाले, पूर्वी अधिवेशनात माण खटाव तालुक्याचा विषय निघत असे. दुष्काळाचा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात असे. आता मात्र आमचा तो मित्र दुसरीकडे दुसऱ्या कामाला असतो. त्यामुळे आता या तालुक्यातील प्रश्न नसतात. तेव्हा ते आता वेगळ्या कामात असतात असा टोला नं पटोळे यांनी जयकुमार गोरे याना लगावला.

यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार वर देखील टीका केली. भाजपाला काँग्रेसचा राग आहे. असे म्हणत भाजपने पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो घेतला नाही, म्हणजे भाजपाला किती राग आहे ते दिसून येते. अशी टीका नाना पाटोले यांनी केली तसेच महाराष्ट्रात ६५ टक्के लोकांनी विकत घेऊन लस घेतली आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल

 

You might also like