मोदींनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’ हे तीन ‘चि’ दिले ; नाना पटोलेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’ हे तीन ‘चि’ दिले आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला.

मोदी सरकारच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सुप्रीम कोर्टाला यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनीच टास्क फोर्स नेमला. पंतप्रधान मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी लसीकरणाचा सावळा गोंधळ करून ठेवला आहे. 130 कोटी जनतेसाठी सरकारने घरोघरी जाऊन मोफत लसीकरण करायला हवे होते पण त्यांनी ते केले नाही. असे नाना पटोले म्हणाले.

भारतातील लोकसंख्या विचारात घेता 300 कोटी लसींची आवश्यकता आहे. ती लवकर पुर्ण होणे अवघड आहे. घाईगडबडीत मोदी सरकारने चीनशी काही गुप्त करार केला आहे की काय? अशी शंका उपस्थित होत असून अशा गुप्त करारातून चीनचा कचरा लस म्हणून भारतीय जनतेवर लादतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. असेही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान, देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका पोहोचवला आहे. देशाला या संकटातून बाहेर काढून पुन्हा उभे करण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी काँग्रेस देशाचा आत्मा आहे असे म्हटले आहे त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत, असे नाना पटोले यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment