मोदींनी तरी शेतकर्‍यांच्या खात्यात 15 लाख कुठे जमा केले? विधानसभेत पंतप्रधानांवर गंभीर आरोप…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधीमंडळ अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरुवात झाली असून यावेळी वीज बिल माफी वरून विरोधकांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत सवाल केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानाचा दाखला दिल्यांनतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला, नितीन राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली

नितीन राऊत म्हणाले कि , इतर बाबतीत तुम्ही सूट देता मग वीज बिलात सूट का देत नाही असे विरोधक म्हणतात पण सूट तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचे जाहीर केल होत पण कुठे दिले ? असे नितीन राऊत यांनी म्हणताच फडणवीस यांनी संताप व्यक्त केला , नितीन राऊत यांनी सभागृहाची माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली.

विधानसभेत पंतप्रधान मोदींवर ऊर्जामंत्र्यांनी केला हा गंभीर आरोप..फडणवीसांची तळपायाची आग केली मस्तकात

नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचे विधान केलं याचा पुरावा नितीन राऊत यांनी द्यावा असे खुलं आव्हान फडणवीसांनी दिले. देशाच्या पंतप्रधानांवर वाटेल ते बोललेलं आम्ही चालू देणार नाही, त्यामुळे नितीन राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली

Leave a Comment