काँग्रेस पाकिस्तानच्या नव्हे तर शरणार्थी लोकांच्या विरोधात – नरेंद्र मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस पाकिस्तानच्याविरोधात नव्हे तर तिथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटकातील तुमकूर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

“शरण आलेल्या लोकांविरोधातच रॅली काढल्या जात आहेत. मात्र, ज्या पाकिस्तानने तिथल्या अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले, त्यावर त्यांच्या तोंडाला शेवटपर्यंत कुलूप का लावले आहे. पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींची मदत करणे हे आमचं कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू आणि त्यातील बहुतेक दलितांना आम्ही त्यांच्या नशिबाच्या हवाले सोडू शकत नाही,” असेही मोदी यावेळी म्हणाले.

Leave a Comment