सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने ‘बाळासाहेब ठाकरे’ स्टाईलने विचार करावा- बाळासाहेब थोरात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । ‘आता शिवसेनेने ठरवायचे आहे की त्यांनी भाजपच्या किती दबावाखाली राहायचे, काँग्रेसकडे शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ’ असं महत्त्वपूर्ण विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष वेगळ्या फाॅमुर्ल्यास तयार झाल्यास राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयाला येण्याची चिन्हे थोरातांनी घेतलेल्या भूमिकेमुळ निर्माण झाली आहेत. सत्ता स्थापन करण्याची काहीही घाई नाही, योग्य वेळी निर्णय घेण्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जाहीर केली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी वेगळीच आघाडी निर्माण होण्याबाबतही सध्या चर्चा हाेते. याबाबत संगमनेरमध्ये आमदार थोरात यांना विचारले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.

शिवसेनेसोबत सत्तास्थापनेसाठी आम्ही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून परवानगी घेऊ, मात्र त्याआधी शिवसेनेन आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. भाजपाला घाबरायचे अथवा नाही हे आता सर्वस्वी शिवसेनेने ठरवावे. शिवसेनेचा निर्णय झाल्यास आम्ही आमच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांची परवानगी घेऊ अशीही भूमिका थोरात यांनी मांडली. दरम्यान, अनेक मोठमोठे नेते पक्ष सोडून जात असताना आपल्यावर तीन महिन्यांपूर्वी राज्याची जबाबदारी काँग्रेसने टाकली, आपण ती पुरेपूर निभावण्याचा प्रयत्न केला. संगमनेर मतदारसंघाला वेळ देता आला नाही. मात्र आपली निवडणूक कार्यकर्ते आणि जनतेनेच लढवली. त्यामुळे हा संगमनेरच्या जनतेचा विजय असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment