हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अगोदरच महाराष्ट्राचा दौरा न करता मोदी गुजरातला गेल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून मोदींवर टीका केले गेले आहे. अशात आता काँग्रेसकडून थेट मोदीवरच निशाणा साधला गेला आहे. मुंबईत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घाटकोपर परिसरात मोदींविरोधात पोष्टर लावले आहेत. आणि त्यातून “मोदीजी हमारे बच्चो की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया”, असा थेट प्रश्न विचारला आहे.
अगोदरच कोरोना लसींचा तुटवडा सर्वत्र भासत आहे. अशावेळी राज्य सरकारकडूनही लसींच्या उपलब्धतेसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात आलेले आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहान मुलांना देण्यात येणारी व्यक्सीन हि इतर देशात पाठवल्यामुळे महाराष्ट्रात लसींचा तुटवडा जमवू लागला आहे. अगोदरच केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवल्यानंतर संपूर्ण राज्यातून केंद्राच्या या निर्णयाचा निषेध केला गेला. खतांवरील किमती कमी कराव्यात म्हणून अनेक पत्रेही मोदी सरकारला लिहली गेली. हे प्रकरण ताजे असताना आता मोदींनी लहान मुलांची लस प्रदेशात पाठविल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला असून आता मोदी व भाजप सरकारविरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात यापूर्वीही दिल्ली येथेही अशाच प्रकारे पोसथरबाजी करण्याची घटना घडली होती. जागोजागी पोष्टर लावून थेट पंतप्रधान मोदींनाच प्रश्न विचारण्यात आले होते. कोरोनाच्यासोबत लढाई करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्टरबाजी दिलीत जास्त प्रमाणात करण्यात आलेली होती. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार घेत तब्बल पंधरा जणांना अटकही केली. आता मुंबईत असा प्रकार गेल्यामुळे याला महाराष्ट्रातील भाजपमधील नेते कशा प्रकारे तोंड देणार? याबाबत काय उत्तर देणार? हे पहावे लागेल.