काँग्रेसचे शिष्टमंडळ दिल्ली हिंसाग्रस्त भागांचा दौरा करणार; सोनिया गांधींकडे सादर करणार अहवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील हिंसाचाराबद्दल माहिती गोळा करण्यासाठी व अहवाल देण्यासाठी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक टीम तयार केली आहे. या पाच सदस्यीय प्रतिनिधीमंडळाला ईशान्य दिल्लीतील दंगलग्रस्त भागाचा दौरा करून सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सोनिया यांनी मुकुल वासनिक, शक्तीसिंग गोहिल, कुमारी सेलजा, तारिक अन्वर आणि सुष्मिता देव यांना उत्तर-पूर्व दिल्लीतील हिंसा प्रभावित भागात भेट देण्याची जबाबदारी सोपवली आहे.

वेणुगोपाल म्हणाले की, प्रतिनिधीमंडळ बाधित भागाला भेट दिल्यानंतर लगेचच आपला अहवाल सोनिया यांना देईल. महत्त्वाचे म्हणजे ईशान्य दिल्लीतील अनेक भागात हिंसाचारात आतापर्यंत ३९ लोक ठार आणि अनेकजण जखमी झाले आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment