मोदी सरकार अहंकारी आणि आडमुठ्या धोरणांचं; पृथ्वीराज चव्हाणांनी काढले वाभाडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारला आज 7 वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या कारभाराची काँग्रेस पोलखोल करणार असून, मोदी सरकारविरोधात काँग्रेस कडून संपूर्ण राज्यभर निदर्शने चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लेख लिहून मोदी सरकारच्या कामकाजावर कडक शब्दात टीका केली आहे. मोदी सरकार अहंकारी आणि आडमुठ्या धोरणांचं असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलंय.

सत्तेतील मित्रपक्षाला विश्वासात न घेणं हे एक आणखी मोदींच्या अहंकाराचं आणखी एक वैशिष्ट्य. केंद्रातील निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यावर मोदींना मित्रपक्षांची फारशी गरज उरली नाही. त्यामुळेच की काय भाजपाचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि अकाली दलाने भाजपसोबत काडीमोड घेतल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

गेल्या वर्षी मोदी सरकारने तीन कृषी कायद्यांमध्ये अचानक बदल केला. कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणारे काळे कायदे मोदी सरकारने मित्रपक्षाशी किंवा कोणाचाही सल्ला न घेता, संसदेत कोणतीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर रेटून नेले. उत्तरेतील अनेक राज्यांच्या शेतकऱ्यांनी या कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर सहा महिन्यांपासून आंदोलन चालू ठेवले आहे. जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. अत्यंत कडाक्याच्या थंडीत दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे बळी गेले. देशाची संचित मत्ता विकून आत्मनिर्भरतेबाबत भाषणे देणारे मोदी सरकार हे आतापर्यंतच्या भारतातील सर्वांत आडमुठे आणि अहंकारी शासन आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही

दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा केंद्रात निर्विवाद सत्ता स्थापन केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या पाक पुरस्कृत हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. या दुर्दैवी घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीसाठी पुरेपूर वापर करून मते मागितली. ०९ एप्रिल २०१९ रोजी लातूर जिल्ह्यातील औसा येथील जाहीर सभेत मोदी यांनी पुलवामा शहिदांच्या स्मरणार्थ मत देण्याचे आवाहन केले. विकासाऐवजी विखारी राष्ट्रवाद आणि समता व बंधुत्वाऐवजी अल्पसंख्यांकांचा द्वेष या मुद्द्यांवर निवडणूक लढवून भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळविले.असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment