अर्णब गोस्वामी ‘चॅट’प्रकरणाची सरकारनं सखोल चौकशी करावी; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. यावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करत गोस्वामींना संवेदनशील माहिती कोणी पुरवली असा सवाल केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण ट्विट करत म्हणाले, मुंबई पोलिसांनी रिलीज केलेले गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स हे खूपच धक्कादायक आहेत. देशाच्या सुरक्षेबाबतची संवेदनशील माहिती, घटना दुरुस्त्या आणि राजकीय नियुक्त्यांबाबतची माहिती त्यांना कोणी पुरवली? असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.

भारत सरकारने याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली पाहिजे. त्याचबरोबर संरक्षणविषय संसदीय स्थायी समितीने हे प्रकरण प्राधान्याने आपल्याकडे घ्यावे अशी मागणीनीह पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण –

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात पार्थ यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय असा केला आहे. तसेच अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या संवादात फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडवलेल्या आत्मघातकी हल्ल्याबाबत अर्णब यांचे आक्षेपार्ह विधान आढळते. या हल्ल्यात ४० केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. या व्हॉट्सअ‍ॅप संवादात पुलवामा हल्ल्याबाबत अर्णब यांनी केलेल्या विधानाचा समाचार नागरिकांनी ट्विटरसह अन्य समाजमाध्यमांवरून घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like