फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव – पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीच्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत”, असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण  यांनी केले आहे. यावेळी त्यांनी 1 पत्रक सुद्धा शेअर केले आहे.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सावत्र आईप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. लोकसभेत केंद्र सरकारने राज्यांना देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांची माहिती दिली. त्या माहितीनुसार आपण विविध राज्यांमधील रुग्णसंख्या आणि त्यांना देण्यात आलेल्या उपकरणांची माहिती घेतली तर धक्कादायक चित्र निर्माण होत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment