कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण हवं, ‘निरर्थक बात’ नको; राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून आली असली तरी संकट मात्र अजून तळलेले नाही. देशात ठीकठिकाणी बेड, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजनचा तुटवडा अजूनही जाणवत असून लोकांमध्ये भीतीच वातावरण कायम आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटल की कोरोनाशी लढायचं असेल तर चांगली नियत, धोरण आणि निश्चय हवा. महिन्यातून एकदा ‘निरर्थक बात’ करण्याची गरज नाही. कोरोना साथीला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे कोणतीही रणनीती नाही असेही राहुल गांधी यापूर्वी म्हणाले होते.

मोदींची मन की बात –

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातमधून देशातील जनतेशी संवाद साधला. गेल्या सात वर्षात जे काही आपण कमावलं आहे. ती देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीची देण आहे. या सात वर्षात आपण राष्ट्र गौरवाचे हे क्षण एकत्र मिळून अनुभवले आहेत. आपण आपल्याच विचाराने पुढे जात आहोत. कुणाच्याही दबावात नाही. आता भारत आपल्याविरोधात षडयंत्र करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देत आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. हे पाहून अभिमानही वाटत आहे, असंही ते त्यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.