देशाची स्थिती सुधारण्यासाठी राहुल गांधींचे मोदींना ‘तीन’ महत्वपूर्ण सल्ले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना महामारी मुळे देशाची स्थिती सध्याच्या घडीला बिघडून गेली आहे. ही स्तिथी सुधारण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन महत्वपूर्ण सल्ले दिले आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी हे तीन सल्ले दिले आहेत.

1) गरीबांच्या बँक खात्यात पैसे जमा करा

2) देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या लघू आणि मध्यम उद्योगांना वाचवा. त्यांना आर्थिक डबघाईतून सुधारण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्या

३) खासगीकरण थांबवा, देशाची युवा पिढी तुमच्याकडे आशेने पाहते आहे. त्यांना दिलासा देणं हे तुमचं काम आहे.

हे तीन उपाय राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले  आहेत.

देशाची युवा पिढी ही या देशाचं भविष्य आहे, सध्या या पिढीलाही देशाचं भवितव्य दिसतं नाही. कोरोनाची साथ येण्याआधी मी सांगितलं होतं की वादळ येतंय, सावध व्हा आणि तयारीला लागा. त्यावेळी मोदी सरकारने माझी खिल्ली उडवली. जेव्हा करोनाची साथ आली तेव्हा मी पुन्हा एकदा सल्ला दिला. युवकांच्या भवितव्यासाठी मोदी सरकारला तीन काम करावी लागतील असं मी तेव्हा म्हटलं होतं. प्रत्येक गरीबाच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे, लघू आणि मध्यम उद्योग हे युवकांचं भविष्य आहे त्यांचं रक्षण करा. धोरणात्मक निर्णय घ्या आणि स्थिती सुधारा. हे मी तेव्हाही सांगितलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like