अन्नदाता माँगे अधिकार, सरकार करे अत्याचार ; राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रावर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अन्नदाता अधिकार मागत असताना सरकार त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचे राहुल गांधींनी म्हंटल.

राहुल गांधींनी ट्विट करत म्हंटल की ज्या शेतकऱ्यांची मुलं देशाच्या सीमेवर आपला जीवही अर्पण करतात. त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी केंद्र सरकारने दिल्लीच्या सीमांवर खिळे अंथरले आहेत. ते म्हणाले, शेतकरी आपला अधिकार मागत आहेत. मात्र, केंद्र सरकार त्यांना अधिकार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करत आहे.

दरम्यान मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी अजून आंदोलन करत असून शेतकरी दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत शेतकरी नेत्यांसोबत अनेक बैठका घेऊन देखील अद्याप यावर तोडगा निघाला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like