लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली थांबत नाही; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेऊन टीका करत असतात. कालच देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही सल्ले दिले होते. आता त्यांनी ट्विट करत मोदी सरकार वर टीका केली आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही असे राहुल गांधी यांनी म्हंटल.

कालच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर थेट हल्ला करताना कोरोना रोखण्यात सिस्टिम नव्हे तर मोदी सरकार फेल गेल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी आज ट्विट करत थेट मोदींवर निशाणा साधला आहे. जनतेचा जीव जात आहे. पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबलेली नाही, अशी टीका राहुल यांनी केली आहे. या ट्विटसोबत त्यांनी जीएसटी हा हॅशटॅगही वापरला आहे.

सरकारने विदेशातून येणाऱ्या कोरोना लसींवरील जीएसटी हटवला आहे. मात्र, देशांतर्गत कोरोना लसीच्या खरेदीवर जीएसटी लावला आहे. केंद्र सरकारकडून 5 टक्के जीएसटी आकारला जात आहे. केंद्र सरकारच्या या धोरणावरच राहुल यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like