GST म्हणजे आर्थिक सर्वनाश ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जीडीपीच्या घसरणीवरुन केंद्र सरकारावर निशाणा साधला आहे. जीएसटी टॅक्स हेच जीडीपीमधील घसणीचं एक मोठ कारण असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. रविवारी राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, जीडीपीच्या घसरणीचं एक मोठं कारण म्हणजे मोदी सरकारचा गब्बर सिंह टॅक्स (GST) आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेवर आपला व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत राहुल गांधी म्हणाले की, जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश आहे. गरिबांवर एकप्रकारचं आर्थिक आक्रमण आहे. छोटे छोटे दुकानदार, लहान आणि मध्यम व्यावसायिक तसेच शेतकरी आणि कामगारांवर एकप्रकारे आक्रमण आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलेय की, “GDP मध्ये एतिहासिक घसणीचं आणखी एक कारण म्हणजे मोदी सरकाराचा गब्बर सिंह टॅक्स (GST) आहे. यामुळे खूप नुकसान झालेय. लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांचं नुकसान तर झालेच आहे शिवाय कोट्यवधी नोकऱ्या आणि तरुणांचा भविष्य.. तसेच अनेक राज्यांचं भविष्य जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment