नवी दिल्ली । एका हिंदी वृत्तवाहिनीवर सुरु असलेल्या वाद-विवाद कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वृत्तवाहिनीवाले ब्रेकिंग देण्याच्या नादात असल्याने त्यांनी या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं नाही, मात्र “त्यांनी मला मारलं” हे शब्द काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांनी आपल्या मरण्यापूर्वी आपल्याकडे व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या पत्नी संगीता त्यागी यांनी दिली आहे. त्यामुळे त्यागी प्रकरणाला आता नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.
TV डिबेट के दौरान संबित पात्रा ने जो व्यक्तिगत टिप्पणियां और लांछन राजीव त्यागी पर लगाये उसके कारण ही राजीव त्यागी को हृदयघात हुआ..
'संबित पात्रा ही असली गुनहगार है'
– संगीता त्यागी (स्व. राजीव त्यागी की धर्मपत्नी)#ArrestSambitPatrapic.twitter.com/TgB381NujE— Dehradun Congress (@INCDehradun) August 13, 2020
अँकर रोहित सरदाना आणि भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी चढ्या आवाजात आणि नको त्या शब्दांमध्ये राजीव त्यागी यांना टिप्पणी करत त्रास दिल्याची तक्रार संगीता त्यागी यांनी केली आहे. समाज माध्यमांतूनही या घटनेवर ताशेरे ओढण्यात येत असून संबीत पात्रांना अटक करण्याची मागणीही जोर धरु लागली आहे. वृत्तवाहिनीवरील चर्चा या समाजातील तेढ वाढवण्यासाठीच घेता का? असा संतप्त सवालही नेटकऱ्यांनी विचारला आहे. दरम्यान, संगीता त्यागी यांच्या आरोपानंतर या प्रकरणात कोणती नवीन घडामोड घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”