बाबरी मशीद विध्वंस प्रकरण: CBI कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात- काँग्रेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वादग्रस्त बाबरी मशीद प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेचे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियारसह सर्व 32 आरोपींना साक्षीअभावी निर्दोष ठरवले आहे. न्यायालयानं बाबरी मशीद पाडण्याचा कट पूर्वनियोजित नव्हता, असं सांगत या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बाबरी मशीद विध्वंससंदर्भात सीबीआय कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा काँग्रेसने विरोध केला आहे. ‘बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सर्वांची निर्दोष मुक्तता करणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आहे. कारण, सुप्रीम कोर्टाने हा गुन्हा असल्याचे सांगितले होते असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

सुरजेवाला म्हणाले, ‘देशाला माहिती आहे, की भाजपने कट आखला होता आणि तत्कालीन भाजप सरकारचा यात समावेश होता. सुप्रीम कोर्टने याला गुन्हा असल्याचे सांगितले होते. संपूर्ण देश आशा करतोय की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांनी विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करावी.

काय आहे निर्णय?
६ डिसेंबर १९२ साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ही घटना अचानक घडली असं देखील कोर्टानं म्हटलं आहे. या प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. त्यातील 17 आरोपींचं निधन झालं आहे. या सर्वांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment