हिंदूस्तानी भाऊला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपच्या संबंधित लोकांची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आंदोलना साठी विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला अटक करण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हिंदुस्थानी भाऊ आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडिया वर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपा/संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेक वेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते.

हल्ली ज्या पध्दतीने मुलांना भडकवण्याचे काम करत आहे व पध्दतशीरपणे आंदोलनं केली जात आहेत त्यामागे मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव दिसतो. या सर्व प्रकाराची खोल चौकशी मविआ सरकारने करावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.