Saturday, June 3, 2023

मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेल्यांनतर त्यांनी कंपनीचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय निर्णय घेतला. इतकच नव्हे तर अदानी समूहाच्या काही कर्मचाऱ्यांनी गरबा खेळत आनंद साजरा केल्याचे देखील समोर आले. याप्रकरणी मनसेने अदानी समूहाला इशारा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील यावर भाष्य करत थेट भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे

मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेलें असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही असा टोलाही त्यांनी लगावला.