Saturday, February 4, 2023

भाजप हा टवाळखोरांचा पक्ष; काँग्रेसचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आदर पुनवाला धमकी प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. पुनावालांना सुरक्षा का मागावी लागली हा प्रश्न गंभीर असून सदर प्रकरणाबाबत आमच्याकडे काही माहिती उपलब्ध आहे. योग्य वेळ येताच ती सर्वांसरमोर आणली जाईल, तेव्हा यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांनी खबरदार रहावं’, अशा इशारा भाजप आमदार शेलार यांनी दिला होता. यांवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर पलटवार करत भाजप हा टवाळखोरांचा पक्ष आहे अशा शब्दांत घणाघात केला.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हणले की नाना पटोले यांनी अदार पुनावाला यांच्या तक्रारीवरून सवाल केला. लसीकरणाबाबत मोदी सरकारच्या नियोजनशून्यतेवर बोट ठेवले. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना केंद्राने रेमडेसिवीर व लसींची निर्यात का केली हा प्रश्न उपस्थित केला.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने हेच प्रश्न विचारले असतानाही आशिष शेलार यांनी भाजपा ची मुजोरपणा ची परंपरा कायम राखली. भाजपा हा टवाळखोरांचा पक्ष आहे हे स्पष्ट आहेच. त्यामुळे कालाकांडी वगैरे भाषाही त्यांनाच शोभू जाणे. भाजपा नेत्यांनी कितीही टवाळखोरी केली तरी काँग्रेस जनतेचा आवाज उचलत राहील.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.